26 January 2021

News Flash

अजिंक्यच्या शतकी खेळीने कांगारु बेजार, भारताला पहिल्या डावात आश्वासक आघाडी

कसोटी कारकिर्दीतलं अजिंक्यचं १२ वं शतक

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटीत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मेलबर्नच्या मैदानावर पाय रोवून कांगारुंच्या माऱ्याचा सामना करत अजिंक्य रहाणेने शतक झळकावलं आहे. गेल्या काही सामन्यांत अजिंक्यला सूर गवसत नव्हता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातही अजिंक्य आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला होता. मात्र विराट कोहली माघारी परतल्यानंतरही अजिंक्यने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळत शतक झळकावून पहिल्या डावात संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

कसोटी क्रिकेटमधलं अजिंक्य रहाणेचं हे १२ वं शतक ठरलं. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या खेळात अजिंक्यने हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. हनुमा विहारीसोबत भागीदारी करताना सावध पवित्रा घेऊन खेळणाऱ्या अजिंक्यने ऋषभ पंत फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक फलंदाजी करत संघाची धावगती वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 12:14 pm

Web Title: ind vs aus 2nd test melbourne captain ajinkya rahane slam his 12th century helps team india to take lead in 1st inning psd 91
Next Stories
1 BLOG : ऋषभ पंत…असून अडचण, नसून खोळंबा !
2 २०१८ पासून पुजाराच्या शतकाची पाटी कोरीच, भारताच्या चिंतेत वाढ
3 Ind vs Aus : कर्णधार अजिंक्यची एकाकी लढत, अर्धशतकी खेळीसह दिग्गज कर्णधारांच्या पंगतीत स्थान
Just Now!
X