IND vs AUS 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्टेलियाने भारतावर ३२ धावांनी विजय मिळवला. ३१४ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २८१ धावात आटोपला. कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची दमदार खेळी केली. पण इतर फलंदाजाकडून त्याला अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने विजयासह मालिकेत २-१ असे पुनरागमन केले. एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करणाऱ्या उस्मान ख्वाजाला सामनावीर जाहीर करण्यात आले.

३१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन १ धाव करून बाद झाला. १४ चेंडूत १४ धावा करणारा भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पायचीत झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावत चांगली सुरुवात केली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. १४ चेंडूत १४ धावा करणारा भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पायचीत झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावत चांगली सुरुवात केली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. स्फोटक फलंदाज अंबाती रायुडू २ धावांवर त्रिफळाचीत झाला. अत्यंत सुंदर अशा चेंडूवर कमिन्सने त्याचा अडथळा दूर केला. त्याने ८ चेंडू खेळले.

रांचीच्या मैदानावर सामना असल्याने तेथील ‘लोकल बॉय’ महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष होते. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर तो झॅम्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्याने ४२ चेंडूत २६ धावा केल्या. एकीकडे गडी बाद होत असताना कोहलीने मात्र आपली लय कायम राखली. त्याने संयमी खेळी करत ५२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. पण त्यानंतर मराठमोळा केदार जाधव झॅम्पाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि भारताचा पाचवा गडी माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत २६ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार कोहलीने मात्र खेळ सुरु ठेवत आणि आपली लय कायम राखत तिसऱ्या सामन्यातही धडाकेबाज शतक ठोकले. पण तो त्रिफळाचीत झाला. त्याने ९५ चेंडूत १२३ धावा केल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार ठोकला.

जाडेजा आणि विजय शंकर या शेवटच्या फलंदाजांच्या जोडीवर भारताची मदार होती. मात्र धावगतीचा पाठलाग करताना विजय मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद झाला. त्याने विराटला चांगली साथ दिली होती. पण त्याला केवळ ३२ धावा करता आल्या. चांगली फलंदाजी करणारा रवींद्र जाडेजा फटकेबाजी करताना बाद झाला. त्याने ३१ चेंडूत २४ धावा केल्या. पाठोपाठ शमीदेखील माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ८ धावा केल्या. लगेचच कुलदीप यादवदेखील १० धावांवर झेलबाद झाला. त्यामुळे भारताचा ३२ धावांनी पराभव झाला.

त्याआधी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान दिले आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक (१०४) आणि कर्णधार फिंचची ९३ धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ५ बाद ३१३ धावा केल्या. स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यानेही ३१ चेंडूत ४७ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा होती. मात्र शेवटच्या १५ षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाला लगाम लावण्यात टीम इंडियाला यश आले. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक ३ बळी टिपले.

दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहली याने मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकली होती. या सामन्यात भारताने संघात बदल केलेला नव्हता. मात्र ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल केला होता. वेगवान गोलंदाज कुल्टर नाईलच्या जागी त्यांनी संघात झाय रिचर्डसनला स्थान दिले होते.

Live Blog

21:09 (IST)08 Mar 2019
जाडेजा, शमी, कुलदीप माघारी, भारताचा ३२ धावांनी पराभव

चांगली फलंदाजी करणारा रवींद्र जाडेजा फटकेबाजी करताना बाद झाला. त्याने ३१ चेंडूत २४ धावा केल्या. पाठोपाठ शमीदेखील माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ८ धावा केल्या. लगेचच कुलदीप यादवदेखील १० धावांवर झेलबाद झाला. त्यामुळे भारताचा ३२ धावांनी पराभव झाला.

20:48 (IST)08 Mar 2019
विजय शंकर झेलबाद, भारताचा सातवा गडी माघारी

जाडेजा आणि विजय शंकर या शेवटच्या फलंदाजांच्या जोडीवर भारताची मदार होती. मात्र धावगतीचा पाठलाग करताना विजय मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद झाला. त्याने विराटला चांगली साथ दिली होती. पण त्याला केवळ ३२ धावा करता आल्या.

20:24 (IST)08 Mar 2019
शतकवीर कोहली माघारी, भारताला सहावा धक्का

सलग दोन सामन्यात शतक झळकावणारा कर्णधार कोहली त्रिफळाचीत झाला. त्याने ९५ चेंडूत १२३ धावा केल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार ठोकला.

20:14 (IST)08 Mar 2019
कर्णधार कोहलीचे धडाकेबाज शतक

दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार कोहलीने आपली लय कायम राखत तिसऱ्या सामन्यातही धडाकेबाज शतक ठोकले. त्याने ८५ चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने चौकार षटकारांची बरसात केली.

19:56 (IST)08 Mar 2019
केदार जाधव पायचीत, भारताचा पाचवा गडी माघारी

मराठमोळा केदार जाधव झॅम्पाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि भारताचा पाचवा गडी माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत २६ धावा केल्या.

19:24 (IST)08 Mar 2019
कर्णधार कोहलीचे ५२ चेंडूत अर्धशतक

एकीकडे गडी बाद होत असताना कोहलीने मात्र आपली लय कायम राखली आहे. त्याने संयमी खेळी करत ५२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.

19:11 (IST)08 Mar 2019
धोनी त्रिफळाचीत; भारताला चौथा धक्का

रांचीच्या मैदानावर सामना असल्याने तेथील 'लोकल बॉय' महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष होते. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर तो झॅम्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्याने ४२ चेंडूत २६ धावा केल्या.

18:14 (IST)08 Mar 2019
रायुडू त्रिफळाचीत; भारताला तिसरा धक्का

स्फोटक फलंदाज अंबाती रायुडू २ धावांवर त्रिफळाचीत झाला. अत्यंत सुंदर अशा चेंडूवर कमिन्सने त्याचा अडथळा दूर केला. त्याने ८ चेंडू खेळले.

18:05 (IST)08 Mar 2019
भारताला दुसरा धक्का, रोहित शर्मा माघारी

१४ चेंडूत १४ धावा करणारा भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पायचीत झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावत चांगली सुरुवात केली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही.

18:01 (IST)08 Mar 2019
भारताला पहिला धक्का, शिखर धवन बाद

३१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन १ धाव करून बाद झाला.

17:07 (IST)08 Mar 2019
ख्वाजा-फिंचचा दणका; भारतापुढे ३१४ धावांचे आव्हान

सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक (१०४) आणि कर्णधार फिंचची ९३ धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ५ बाद ३१३ धावा केल्या.  ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक ३ बळी टिपले.

16:42 (IST)08 Mar 2019
मार्श पाठोपाठ हॅंड्सकॉम्ब बाद, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी

मार्श पाठोपाठ हॅंड्सकॉम्ब बाद, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी

16:27 (IST)08 Mar 2019
मॅक्सवेल ४७ धावांवर माघारी, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने धमाकेदार सुरुवात केली होती. पण जाडेजाने क्षेत्ररक्षणात तर धोनीने यष्टिरक्षणात चपळता दाखवत त्याला माघारी धाडले. जाडेजाने केलेल्या थ्रो ला धोनीने अलगद दिशा दिली आणि मॅक्सवेलला ४७ धावांवर माघारी धाडले.

16:10 (IST)08 Mar 2019
शतकवीर ख्वाजा बाद, ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का

एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक ठोकल्यानंतर उस्मान ख्वाजाचा १०४ धावांवर माघारी परतला. त्याने ११३ चेंडू खेळले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि १ षटकार लगावले.

16:04 (IST)08 Mar 2019
ख्वाजाने ठोकले वन-डेतील पहिलेवहिले शतक

उस्मान ख्वाजाने एकदिवसीय क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले शतक ठोकले. त्याने १०७ चेंडूत ही कामगिरी केली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि १ षटकार लगावले.

15:40 (IST)08 Mar 2019
फिंच ९३ धावांवर माघारी; अखेर भारताला पहिले यश

धडाकेबाज फलंदाजी करणारा कर्णधार फिंच ९३ धावांवर माघारी परतला. त्याला कुलदीपने पायचीत बाद केले आणि अखेर ३२ व्या षटकात भारताला पहिले यश मिळाले. फिंचने १० चौकार आणि ३ षटकार लगावले.

15:14 (IST)08 Mar 2019
ऑस्ट्रेलियाचा भारताला तडाखा; २५ षटकात दीडशतकी सलामी

ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीम इंडियाला चांगलाच तडाखा दिला असून २५ षटकात त्यांनी दीडशतकी सलामी दिली आहे. उस्मान ख्वाजा आणि कर्णधार फिंच या दोनही सलामीवीरांनी धावांची सत्तरी पार केली असून भारताची डोकेदुखी वाढतच आहे.

14:56 (IST)08 Mar 2019
दोनही सलामीवीरांची अर्धशतके

कर्णधार फिंचपाठोपाठ उस्मान ख्वाजानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत आतापर्यंत ८ चौकार लगावले आहेत. तर फिंचने आतापर्यंत आपल्या नाबाद ६६ धावांच्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार लगावले आहेत.

14:40 (IST)08 Mar 2019
१७व्या षटकात ऑस्ट्रेलियाची शतकी सलामी, फिंचचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियाच्या संघाने भक्कम सुरुवात करत १७व्या षटकात शतकी सलामी दिली. कर्णधार फिंचने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाचे शतक गाठले.

14:21 (IST)08 Mar 2019
ऑस्ट्रेलियाची दमदार सुरूवात; १०व्या षटकात अर्धशतकी सलामी

पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली आहे. १०व्या षटकात त्यानी अर्धशतकी सलामी दिली.

13:39 (IST)08 Mar 2019
भारताने एकमेव रिव्ह्यू गमावला

जसप्रीत बुमराहने टाकलेला चेंडू कर्णधार फिंचच्या पायावर आदळला. भारताने पंचांकडे अपील केले पण पंचानी अपील फेटाळले. त्यानंतर भारताने DRS ची मदत घेतली, पण तिसऱ्या पंचानीही अपील फेटाळले. त्यामुळे भारताने दुसऱ्याच षटकात à¤à¤•à¤®à¥‡à¤µ रिव्ह्यू गमावला.

13:07 (IST)08 Mar 2019
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गोलंदाजी स्वीकारली आहे. भारताच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.