बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावरील अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २८६ धावांपर्यंत मजल मारली. स्मिथचं शतक आणि लाबुशेनचं अर्धशतक या जोरावर कांगारुंनी भारतीय गोलंदाजांच्या माऱ्याला तोंड देत सन्मानजनक धावसंख्या गाठली. भारताकडून मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं.

अवश्य वाचा – Video : भन्नाट कॅच आणि हटके सेलिब्रेशन, ‘किंग कोहली’ चा स्वॅग पाहिलात का??

शमीने कांगारुंच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ४ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये ४ बळी घेण्याची ही शमीची दहावी वेळ ठरली आहे.

सुरुवातीच्या षटकांमध्ये शमीने कांगारुंचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला घरचा रस्ता दाखवला. यानंतर खेळपट्टीवर जम बसवलेल्या स्टिव्ह स्मिथलाही शमीने माघारी धाडलं. यानंतर कमिन्स आणि झॅम्पाचा त्रिफळा उडवत शमीने कांगारुंचं उरलं सुरलं आव्हानही संपवलं.