ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या वन-डे सामन्यात ४ बदल केले. आयपीएलमध्ये SRH संघाकडून खेळताना तेरावा हंगाम गाजवणाऱ्या तामिळनाडूच्या टी. नटराजनला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ३०२ धावांपर्यंत मजल मारली.

यानंतर गोलंदाजीदरम्यान नटराजनने ऑस्ट्रेलियाच्या लाबुशेनला माघारी धाडत दणक्यात पदार्पण केलं. पाहा नटराजनने लाबुशेनला कशा पद्धतीने बाद केलं…

या बहारदार कामगिरीनंतर सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनी नटराजनचं कौतुक केलं आहे.

नटराजनने लाबुशेनला माघारी धाडल्यानंतर मराठमोळ्या शार्दुल ठाकूरनेही स्टिव्ह स्मिथ आणि हेन्रिकेज यांना माघारी धाडत महत्वाच्या क्षणी भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिलं.