भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी २०२० वर्षही चांगलं जाताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात, २८७ धावांचा पाठलाग करत असताना विराट कोहलीने आपला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला. कर्णधार या नात्याने विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी सर्वात जलद करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसऱ्या वन-डे सामन्यात विराटला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी अवघ्या १७ धावांची गरज होती. या १७ धावा काढत विराटने धोनीला मागे टाकलं आहे. अवघ्या ८१ धावांत विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली.

जाणून घ्या सर्वात जलद ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारे कर्णधार –

  • विराट कोहली – ८१ डाव
  • महेंद्रसिंह धोनी – १२७ डाव
  • रिकी पाँटींग – १३१ डाव
  • ग्रॅम स्मिथ – १३५ डाव
  • सौरव गांगुली – १३६ डाव
  • मोहम्मद अझरुद्दीन – १५१ डाव

त्याआधी, स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या फलंदाजांनी केलेल्या आश्वासक खेळामुळे कांगारुंनी अखेरच्या वन-डे सामन्यात २८६ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा निर्णय पुरता चुकला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून भेदक मारा करत कांगारुंच्या धावगतीवर अंकुश लावला. मात्र स्मिथ आणि लाबुशेनच्या महत्वपूर्ण भागीदारीमुळे कांगारुंनी सन्मानजनक धावसंख्या गाठली.

अवश्य वाचा – Video : भन्नाट कॅच आणि हटके सेलिब्रेशन, ‘किंग कोहली’ चा स्वॅग पाहिलात का??

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd odi virat kohli break ms dhoni record becomes fastest captain to reach 5 k runs mark psd
First published on: 19-01-2020 at 19:29 IST