पहिले दोन वन-डे सामने गमावल्यानंतर, तिसऱ्या सामन्यात व्हाईटवॉश टाळण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने आपल्या निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच ठेवलं. तिसऱ्या वन-डे सामन्यासाठी भारतीय संघाने ४ बदल केले, पण त्याचा फारसा फरक पडलेला दिसला नाही. युवा शुबमन गिल आणि धवन जोडीने भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. परंतू धवन यानंतर लगेचच माघारी परतला.

अवश्य वाचा –  Ind vs Aus : सलग दुसऱ्या सामन्यात विराटने मोडला सचिनचा विक्रम, दिग्गजांच्या पंगतीत स्थान

विराट कोहलीने शुबमन गिलच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान विराटने वन-डे क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. परंतू दुसऱ्या बाजून गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिल्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली. परंतू विराट कोहलीने हार न मानता एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. यानिमीत्ताने विराटने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्तधावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू कॅलिसशी बरोबरी केली आहे.

तिसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. शुबमन गिलने फटकेबाजी करत चांगली चमक दाखवली. दरम्यान विराट कोहलीही ६३ धावांची खेळी करुन जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला.