IND vs AUS 5th ODI : भारताविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३५ धावांनी विजय मिळवला. २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २३७ धावांवर आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी जिंकली.

उस्मान ख्वाजाचे शतक (१००) आणि पीटर हॅंड्सकॉम्बचे अर्धशतक (५२) यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गेल्या सामन्यात १४३ धावांची झंझावाती खेळी करणारा शिखर धवन १२ धावांवर बाद झाला आणि भारताला लवकर पहिला धक्का बसला. त्याने १५ चेंडूत २ चौकार लगावले. चांगली सुरुवात मिळालेला कर्णधार विराट कोहलीही लवकर बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्याने २२ चेंडूत २ चौकारांसह २० धावा केल्या. ऋषभ पंतही स्वस्तात झेलबाद झाला. १६ चेंडूत १६ धावा करून तो बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. एकीकडे गडी बाद होताना रोहित शर्माचे मात्र संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील ८ हजार धावांचा टप्पा गाठला. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर २१ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्या धक्क्यातून भारत सावरत असतानाच एकाच षटकात रोहित आणि जाडेजा बाद झाले. रोहितने ४ चौकारांसह ८९ चेंडूत ५६ धावा केल्या. तर जाडेजा शून्यावर माघारी परतला. केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर भुवनेश्वर (४६) तर केदार (४४) धावांवर बाद झाला. त्यानंतर शमीदेखील १ धाव करून बाद झाला. अखेर कुलदीप यादवचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला.

त्याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४३ चेंडूत २७ धावा करणाऱ्या कर्णधार फिंचला लवकर माघारी परतावे लागले. रवींद्र जाडेजाने त्याला त्रिफळाचित केले. त्याने खेळीत ४ चौकार लगावले. ख्वाजाने शतक ठोकले. पण १० चौकार आणि २ षटकार फटकावून आपले मालिकेतील दुसरे शतक झळकावणारा उस्मान ख्वाजा लगेचच बाद झाला. त्याने १०० धावा केल्या. मालिकेत त्याच्या सर्वात जास्त म्हणजेच एकूण ३८३ धावा आहेत. ख्वाजापाठोपाठ स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल आजच्या सामन्यात लवकर बाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. त्यानंतर जाडेजाने त्याला झेलबाद केले. गेल्या सामन्यात शतक झळकावलेल्या पीटर हॅंड्सकॉम्बने लय कायम ठेवत संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार खेचले.अर्धशतक ठोकल्यावर लगेच तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. त्याने ६० चेंडूत ५२ धावा केल्या. गेल्या सामन्यात धमाकेदार ८४ धावांची नाबाद खेळी करणारा धोकादायक ऍस्टन टर्नर झेलबाद झाला. या बरोबरच ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला. त्याने २० धावा केल्या. स्टॉयनिस (२०), कॅरी (३), कमिन्स (१५) हे फलंदाजदेखील झटपट बाद झाले. पण तळाच्या फळातील झाय रिचर्डसन याने २१ चेंडूत २९ धावा करून ऑस्ट्रेलियाला २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली.

Live Blog

21:29 (IST)13 Mar 2019
विश्वचषकाआधीच्या चाचणी परीक्षेत भारत नापास, कांगारुंची वन-डे मालिकेत बाजी

भारताविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३५ धावांनी विजय मिळवला. २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २३७ धावांवर आटोपला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी जिंकली.

20:54 (IST)13 Mar 2019
केदार, भुवनेश्वर माघारी; भारत पराभवाच्या छायेत

केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर भुवनेश्वर (४६) तर केदार (४४) धावांवर बाद झाला.

19:43 (IST)13 Mar 2019
रोहित, जाडेजा एकाच षटकात बाद; भारताचे ६ गडी तंबूत

त्या धक्क्यातून भारत सावरत असतानाच एकाच षटकात रोहित आणि जाडेजा बाद झाले. रोहितने ४ चौकारांसह ८९ चेंडूत ५६ धावा केल्या. तर जाडेजा शून्यावर माघारी परतला.

19:28 (IST)13 Mar 2019
विजय शंकर बाद, भारताला चौथा धक्का

अष्टपैलू खेळाडू विजय शंकर २१ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला.

19:25 (IST)13 Mar 2019
रोहित शर्माचे संयमी अर्धशतक

एकीकडे गडी बाद होताना रोहित शर्माचे मात्र संयमी खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीच्या जोरावर त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील ८ हजार धावांचा टप्पा गाठला.

19:04 (IST)13 Mar 2019
ऋषभ पंत झेलबाद, भारताला तिसरा धक्का

ऋषभ पंतही स्वस्तात झेलबाद झाला. १६ चेंडूत १६ धावा करून तो बाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला.

18:40 (IST)13 Mar 2019
कर्णधार कोहली बाद, भारताला दुसरा धक्का

चांगली सुरुवात मिळालेला कर्णधार विराट कोहलीही लवकर बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्याने २२ चेंडूत २ चौकारांसह २० धावा केल्या. 

18:04 (IST)13 Mar 2019
धवन १२ धावांवर बाद, भारताला पहिला धक्का

गेल्या सामन्यात १४३ धावांची झंझावाती खेळी करणारा शिखर धवन १२ धावांवर बाद झाला आणि भारताला लवकर पहिला धक्का बसला. त्याने १५ चेंडूत २ चौकार लगावले.

17:12 (IST)13 Mar 2019
ख्वाजाचे झुंजार शतक; भारतापुढे २७३ धावांचे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या एकदिवसीय सामन्यात उस्मान ख्वाजाचे शतक (१००) आणि पीटर हॅंड्सकॉम्बचे अर्धशतक (५२) यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २७३ धावांचे आव्हान ठेवले आहे. भुवनेश्वर कुमारने ३ बळी टिपले.

17:02 (IST)13 Mar 2019
कमिन्स झेलबाद, ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का

कमिन्स झेलबाद, ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का

16:48 (IST)13 Mar 2019
कॅरी ३ धावांवर बाद, ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी

कॅरी ३ धावांवर बाद, ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी

16:43 (IST)13 Mar 2019
स्टॉयनिस त्रिफळाचीत, ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी माघारी

स्टॉयनिस त्रिफळाचीत, ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी माघारी

16:26 (IST)13 Mar 2019
धोकादायक टर्नर झेलबाद, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत

गेल्या सामन्यात धमाकेदार ८४ धावांची नाबाद खेळी करणारा धोकादायक ऍस्टन टर्नर झेलबाद झाला. या बरोबरच ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला. त्याने २० धावा केल्या.

16:04 (IST)13 Mar 2019
अर्धशतकवीर हॅंड्सकॉम्ब झेलबाद; ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का

अर्धशतक ठोकल्यावर लगेच तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. त्याने ६० चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने

15:59 (IST)13 Mar 2019
पीटर हॅंड्सकॉम्बचे संयमी अर्धशतक

गेल्या सामन्यात शतक झळकावलेल्या पीटर हॅंड्सकॉम्बने लय कायम ठेवत संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार खेचले.

15:55 (IST)13 Mar 2019
ख्वाजापाठोपाठ मॅक्सवेल झेलबाद, ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल आजच्या सामन्यात लवकर बाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली. त्यानंतर जाडेजाने त्याला झेलबाद केले.

15:49 (IST)13 Mar 2019
मालिकेतील दुसरे शतक ठोकून ख्वाजा बाद

१० चौकार आणि २ षटकार फटकावून आपले मालिकेतील दुसरे शतक झळकावणारा उस्मान ख्वाजा बाद झाला. त्याने १०० धावा केल्या. मालिकेत त्याच्या सर्वात जास्त म्हणजेच एकूण ३८३ धावा आहेत.

15:40 (IST)13 Mar 2019
ख्वाजाचा धमाका! ठोकले मालिकेतील दुसरे शतक

उस्मान ख्वाजाचा धमाका सुरूच! त्याने या मालिकेतील दुसरे शतक ठोकले. या साठी त्याने १०२ चेंडू घेतले.  या खेळीत त्याने १० चौकार आणि २ षटकार लगावले.

14:52 (IST)13 Mar 2019
ख्वाजाचे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक

ख्वाजाचे हे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक ठरले. पहिल्या २ सामन्यात फारशी चांगली कामगिरी न करता आलेल्या ख्वाजाने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते. तर चौथ्या सामन्यात त्याचे शतक काही धावांनी हुकले होते.

14:42 (IST)13 Mar 2019
कर्णधार फिंच त्रिफळाचीत; ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

४३ चेंडूत २७ धावा करणाऱ्या कर्णधार फिंचला लागले. रवींद्र जाडेजाने त्याला त्रिफळाचित केले. त्याने खेळीत ४ चौकार लगावले.

14:22 (IST)13 Mar 2019
११व्या षटकात ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने झकास सुरुवात केली. ११व्या षटकात ऑस्ट्रेलियाने अर्धशतकी मजल मारली.

13:10 (IST)13 Mar 2019
भारतीय संघात २ बदल; राहुल, चहल संघाबाहेर

भारतीय संघात २ बदल करण्यात आले आहेत. रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांचे संघात पुनरागमन झाले आहे. तर युझवेंद्र चहल ला संघाबाहेर व्हावे लागले आहे. तसेच राहुललाही संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या संघातही २ बदल करण्यात आले आहेत.

13:07 (IST)13 Mar 2019
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. २-२ अशी मालिका बरोबरीत असताना हा सामना जिंकणे मालिका विजयाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.