03 March 2021

News Flash

Video : बुमराहनं षटकार लगावत ठोकलं अर्धशतक; विराट पाहातच राहिला….

बुमराहची अर्धशतकी खेळी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याआधी सराव सामन्याकरता मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी निराशा केली. चांगली सुरुवात केल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. ३ बाद १०२ वरुन भारतीय संघाची अवस्था ९ बाद १२३ अशी दयनीय झाली. अखेरीस जसप्रीत बुमराहने अखेरच्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ७१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. जसप्रीत बुमराहने यादरम्यान प्रथमश्रेणी क्रिकेटमधलं आपलं पहिलं अर्धशतकही झळकावलं.

विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहनं षटकार मारत आपलं पहिलं अर्धशतक पुर्ण केलं. जिथे फलंदाजांना धावा काढता येत नव्हत्या त्या गोलंदाजीसमोर बुमराहनं दमदार अर्धशतक झळकावलं. भारतीय संघाकडून पहिल्या डावात सर्वोच्च धावसंख्या बुमराहच्या नावावर आहे. बुमरागनं षटकार लगावत ठोकलेलं अर्धशतक पाहून कर्णधार विराट कोहलीही चकित झाला. बुमराहनं अर्धशतक झाल्यानंतर हवेत बॅट उचलल्यानंतर विराट कोहलीच्या आनंद गगणात मावेना झाला होता.

(आणखी वाचा : Video : बुमराहचा फटका ग्रीनच्या तोंडावर लागला; त्यानंतर….)

जसं की बुमराहची फलंदाजी पाहून विराट कोहलीला विश्वासच बसत नव्हता. ड्रेसिंगरुममध्ये बसलेला विराट बुमराहचं अर्धशतक पाहून आनंदीत झाला होता. इतर खेळाडूंनीही कोहलीसोबत टाळ्या वाजवत बुमराहाच्या फलंदाजीला दाद दिली. बुमराहनं अर्धशतक झळकावल्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे…

पाहा व्हिडीओ –


बुमराहने ५७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. फिरकीपटू स्वेप्सनने मोहम्मद सिराजला माघारी धाडत भारताचा डाव संपवला. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये परत येत असताना टीम इंडियाच्या सहकाऱ्यांनी जसप्रीत बुमराहला त्याच्या खेळीसाठी गार्ड ऑफ ऑनर देत त्याचं कौतुक केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 10:31 am

Web Title: ind vs aus a jasprit bumrah first half century in test virat kohli gives priceless reaction nck 90
Next Stories
1 युवराज वाढदिवस साजरा करणार नाही, कारण वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
2 ऑस्ट्रेलियाला धक्का; सलामी फलंदाज पहिल्या कसोटी सामन्यातू बाहेर
3 AUS vs IND: ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यात कनकशन नियमांनुसार बदलला खेळाडू
Just Now!
X