चौथ्या कसोटीत भारताने कसोटीसह मालिका विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. चौथ्या दिवशी पावसाचा व्यत्यय येऊनही भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांत गुंडाळला आणि ३२२ धावांची आघाडी घेतली. या पराक्रमाबरोबरच भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलो-ऑन दिला.

नक्की वाचा : तुम्हाला जिंकावसं वाटतंच नाही का?; पॉन्टिंग ऑस्ट्रेलियावर भडकला

कसोटी क्रिकेटमध्ये फॉल-ऑन मिळणे ही कोणत्याही संघासाठी फारशी प्रतिष्ठेची बाब नाही. त्यातच मायभूमीत असे होणे हे अधिक वाईट असते. पण अशीच परिस्थिती तब्बल ३० वर्षांनंतर कांगारुंवर ओढवली. त्यांना मायभूमीत ३० वर्षांनी फॉलो-ऑन स्विकारावा लागला. फिरकीपटू कुलदीप यादवने ९९ धावांत ५ बळी घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर ही वेळ आली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला आपल्या घरच्या मैदानात १९८८ साली फॉलोऑन मिळाला होता.

टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि ६ जानेवारीचा फॉलो-ऑन… जाणून घ्या योगायोग

दरम्यान, पावसामुळे चौथ्या दिवसाच्या खेळाचीही सुरुवात उशिराने झाली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने कमिन्सला त्रिफळाचीत करत कांगारुंवर दडपण आणले. त्यानंतर स्टार्क आणि हँड्सकाॅम्ब यांनी आठव्या विकेट्ससाठी २१ धावांची भागीदारी केली. पण हँड्सकाॅम्ब बाद झाला. हेजलवूड आणि स्टार्क यांनी दहाव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. पण फॉलो-ऑनची नामुष्की ते टाळू शकले नाहीत.