अ‍ॅडलेड कसोटीत मानहानीकारक पराभवासा सामोरं जावं लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दणक्यात पुनरागमन करत कांगारुंवर ८ गडी राखून मात केली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावातही ७० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विजयी फटका लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

आणखी वाचा- मराठमोळ्या रहाणेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू

महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली, मोहम्मद शमी यासारख्या महत्वाच्या खेळाडूंनी माघार घेतल्यानंतरही अजिंक्यने संयमी नेतृत्व करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या निमीत्ताने अजिंक्यने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या तीन सामन्यांत नेतृत्व करुन संघाला विजय मिळवून देणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत आता अजिंक्यचं नाव घेतलं जाईल. याआधी धोनीने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.

आणखी वाचा- पिछली बार क्या बोला था? व्हाईटवॉश?? टीम इंडियाला डिवचणाऱ्या वॉनला जाफरचं प्रत्युत्तर

आणखी वाचा- विराटलाही न जमलेली गोष्ट अजिंक्यने करुन दाखवली, ७ वर्षांनी धोनीच्या कामगिरीशी बरोबरी

याचसोबत ऑस्ट्रेलियात शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. दोन्ही डावांतील आश्वासक खेळीसाठी अजिंक्यला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.