News Flash

IND vs AUS : जेव्हा कांगारुंना रडवणाऱ्या पुजाराला लॉयन म्हणतो, तुला कंटाळा नाही का येत?

पहिल्या दिवसाच्या खेळात घडला प्रकार

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने 193 धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. सलग दोन दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून पुजाराने भारताच्या डावाला आकार दिला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुजाराला बाद करण्याचे हर प्रकारे प्रयत्न करुन पाहिले मात्र त्यांना यश आलं नाही. पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनने गोलंदाजीदरम्यान आगतिक होऊन पुजाराला प्रश्न विचारला, तुला कंटाळा नाही का येत? या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

lyon_chirp_edit_0 from Bob Paine on Vimeo.

अखेर दुसऱ्या दिवशी आपल्या द्विशतकापासून अवघ्या 7 धावा दूर असताना लॉयननेच पुजाराला बाद केलं. मात्र पुजारा माघारी परतल्यानंतरही ऑस्ट्रेलियाची चिंता कमी झाली नाही. यष्टीरक्षक ऋषभ पंतने दीड शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर डोंगराएवढं आव्हान उभं केलं. भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 622 धावांवर आपला डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाअखेरस ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 24 धावा केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 2:56 pm

Web Title: ind vs aus arent you bored yet cheteshwar pujaras stunning ton frustrates nathan lyon
Next Stories
1 IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘हा’ पराक्रम करणारी टीम इंडिया एकमेव!
2 IND vs AUS : सिडनीमध्ये टीम इंडियाने टाकलं इंग्लंड, विंडीजलाही मागे
3 IND vs AUS : भारताची ऐतिहासिक मालिका विजयाकडे वाटचाल
Just Now!
X