टीम इंडियाने यजमान ऑस्ट्रेलियाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असे पराभूत केले. या मालिकेत भारताच्या जसप्रीत बुमराहने सर्वांना आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. बुमराहने मालिकेत एकूण २१ बळी टिपले. त्याच्या धारदार गोलंदाजीबरोबरच त्याची गोलंदाजीची शैलीची खूप चर्चेत राहिली.

त्याच्या या शैलीने लहान मुलांनांही भुरळ पाडली आहे. याबद्दलचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ऑस्ट्रेलियातील एक लहान मुलगा बुमराहसारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका नेटिझन्सने हा व्हिडीओ शेअर करताना जसप्रीत बुमराह आणि समालोचक हर्ष भोगले यांना टॅग केले आहे. ‘तुम्ही मालिका जिंकल्याची एकच अडचण आहे. ती अडचण म्हणजे ऑस्ट्रेलियाची लहान मुलं आता (ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सोडून) भारताच्या गोलंदाजांची नक्कल करू लागले आहेत.’, असे त्या युझरने मस्करीच्या स्वरात म्हटले आहे.

बुमराहनेही हा व्हिडीओ पाहिला. त्याला या मुलाची शैली खूप आवडली. त्यामुळेच बुमराहने त्या मुलाला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, १२ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी बुमराहला विश्रांती देण्यात आली असून मोहम्मद सूरजला संघात स्थान देण्यात आले आहे.