29 September 2020

News Flash

IND vs AUS : पहिल्या टी२०साठी भारतीय संघ जाहीर, मनीष पांडे बाहेर

BCCI ने केली घोषणा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान पहिला टी२० सामना बुधवारी होणार आहे. बीसीसीआयने यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटूसह भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. के.एल राहुलला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येणार की पाच गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरणार हे पाहणे महत्वाचे आहे.

टी२० संघामध्ये परतल्यानंतर भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा विराट कोहलीकडे असणार आहे. यष्टीरक्षकाची जबाबदारी युवा पंतकडे सोपवण्यात आली आहे. तर अनुभवी दिनेश कार्तिकला फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेला अंतिम १२ मध्ये संधी देण्यात आलेली नाही. मनीष पांडेशिवाय उमेश यादव, श्रेयस अय्यर, वाशिंगटन सुंदर यांनाही पहिल्या टी२० मध्ये संघात निवडण्यात आले नाही.

असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, के.एल राहुल, पंत, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि चहल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 12:24 pm

Web Title: ind vs aus bcci announced 12 players for the 1st t20i against australia
Next Stories
1 IND vs AUS : ‘ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याची भारताला नामी संधी!’
2 IND vs AUS : वॉर्नर, स्मिथ, बॅनक्रॉफ्टवरील बंदी कायम
3 सय्यद मोदी खुली बॅडमिंटन स्पर्धा : सायना, श्रीकांतवर भारताच्या आव्हानाची धुरा
Just Now!
X