ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 230 धावांवर रोखलं. युझवेंद्र चहलने 6 बळी घेत यजमान संघाचे निम्मे फलंदाज माघारी धाडले. भुवनेश्वर कुमारने सुरुवातीच्या षटकांत दोन्ही सलामीवीरांना बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटला ढकललं.
यानंतर मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर कुमारने मॅक्सवेलचा झेल टिपला. मॅक्सवेलने हवेत खेळलेला फटका भूवीने जीवाचा आटापीटा करत पकडला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Bhuvneshwar catch pic.twitter.com/b5nZ0MDcBX
— Prem Chopra (@premchoprafan) January 18, 2019
मधल्या फळीत पिटर हँडस्काँबचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने 2-2 बळी घेत चहलला चांगली साथ दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2019 1:58 pm