27 February 2021

News Flash

IND vs AUS : जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम गोलंदाज – विराट कोहली

9 बळी मिळवत जसप्रीत बुमराह सामनावीर

गोलंदाजांनी बजावलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या कसोटी सामन्यात 137 धावांनी मात केली. या विजयासह भारत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराहने सामन्यात 9 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने बुमराहचं तोंडभरुन कौतुक केलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : टीम पेनचं रडगाणं सुरुच, म्हणतो भारताला सोयीची खेळपट्टी बनवल्याने आम्ही हरलो !

“माझ्या मते, आताच्या घडीला जसप्रीत बुमराह हा जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्यात सामना जिंकवून देण्याची ताकद आहे. बुमराहला पर्थसारखी खेळपट्टी मिळाली, तर त्याला थांबवणं कठीण आहे. मी देखील अशा खेळपट्टीवर बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करु शकणार नाही. इतरांपेक्षा त्याची शैली ही वेगळी आहे. त्यामुळे आपल्याकडील जमेच्या बाजूचा तो नेहमी फायदा उचलत असतो.” विराटने जसप्रीच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहच्या नावावर 48 बळी जमा आहेत.

अवश्य वाचा – IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीतले हे 11 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

“गोलंदाजीदरम्यान जसप्रीत नेहमी सकारात्मक असतो. खेळपट्टी कोणतीही असो, त्याचं निरीक्षण करुन झाल्यानंतर आपण कुठल्या टप्प्यावर चेंडू ठेऊ शकतो हा विचार त्याच्या डोक्यात सतत असतो. त्याचे हेच गुण त्याला इतरांपासून वेगळं करतात”, विराट पत्रकारांशी बोलत होता. मेलबर्नमधल्या कामगिरीसाठी बुमराहला सामनावीर किताबाने गौरवण्यात आलं. दोन्ही संघामधला चौथा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 12:10 pm

Web Title: ind vs aus bumrah is the best bowler in world cricket now says virat kohli
Next Stories
1 IND vs AUS : टीम पेनचं रडगाणं सुरुच, म्हणतो भारताला सोयीची खेळपट्टी बनवल्याने आम्ही हरलो !
2 IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीतले हे 11 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?
3 IND vs AUS : जरा विराटकडून शिका, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी फलंदाजांना सुनावलं
Just Now!
X