News Flash

IND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही – रवी शास्त्री

सामन्यात धोनीच्या संयमी खेळीची खूप स्तुती झाली

महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून मात केली. याचबरोबर भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकून कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही बाजी मारली. या सामन्यात धोनीच्या संयमी खेळीची खूप स्तुती झाली. त्याच्या अशा पद्धतीच्या खेळीची मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्तुती केली आहे.

धोनी खूप संयमी खेळाडू आहे. मी सचिन तेंडुलकरला अनेकदा चिडताना पाहिलं आहे. पण महेंद्रसिंग धोनी हा कधीच चिडत नाही. असा खेळाडू ४० वर्षांत एकदाच घडतो. त्यामुळे जागा घेणं हे इतर कोणाला शक्य नाही, असे शास्त्री धोनीची स्तुती करताना म्हणाले.

धोनी हा भारतातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मी आजपर्यंत त्याला कधीही चिडलेला पाहिले नाही. काही वेळा सचिनदेखील चिडलेला मी बघितला आहे. पण धोनीएवढा कोणत्याच व्यक्तीला मी शांत पाहिलेले नाही, असेही शास्त्री म्हणाले.

दरम्यान, धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५१, दुसऱ्या सामन्यात ५५ आणि शेवटच्या सामन्यात ८७ धावा केल्या. त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 11:21 pm

Web Title: ind vs aus coach ravi shastri says have seen sachin tendulkar get angry but not ms dhoni
Next Stories
1 IND vs AUS : मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार – महेंद्रसिंह धोनी
2 IND vs AUS : भारतीय क्रिकेटला वाहून घेतलेला धोनीइतका कोणीही नाही – विराट कोहली
3 #IndvsAus: ‘तो नाही त्याची बॅटच बोलते’, मिम्सच्या माध्यमातून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव
Just Now!
X