X

IND vs AUS : सचिन चिडायचा, पण धोनी अजिबात चिडत नाही – रवी शास्त्री

सामन्यात धोनीच्या संयमी खेळीची खूप स्तुती झाली

महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून मात केली. याचबरोबर भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकून कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही बाजी मारली. या सामन्यात धोनीच्या संयमी खेळीची खूप स्तुती झाली. त्याच्या अशा पद्धतीच्या खेळीची मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्तुती केली आहे.

धोनी खूप संयमी खेळाडू आहे. मी सचिन तेंडुलकरला अनेकदा चिडताना पाहिलं आहे. पण महेंद्रसिंग धोनी हा कधीच चिडत नाही. असा खेळाडू ४० वर्षांत एकदाच घडतो. त्यामुळे जागा घेणं हे इतर कोणाला शक्य नाही, असे शास्त्री धोनीची स्तुती करताना म्हणाले.

धोनी हा भारतातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मी आजपर्यंत त्याला कधीही चिडलेला पाहिले नाही. काही वेळा सचिनदेखील चिडलेला मी बघितला आहे. पण धोनीएवढा कोणत्याच व्यक्तीला मी शांत पाहिलेले नाही, असेही शास्त्री म्हणाले.

दरम्यान, धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५१, दुसऱ्या सामन्यात ५५ आणि शेवटच्या सामन्यात ८७ धावा केल्या. त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

First Published on: January 18, 2019 11:21 pm