भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं फलंदाजीतलं कौशल्य आतापर्यंत आपण सर्वांनी अनुभवलं आहे. कसोटी, वन-डे आणि टी-20 अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कोहली आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखून आहे. अनेक विक्रमही गेल्या काही वर्षांमध्ये कोहलीने आपल्या नावावर जमा केले आहेत. आगामी विश्वचषक स्पर्धेत कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ विजयासाठी प्रबळ दावेदार मानला जातोय. हैदराबादच्या मैदानावर सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत, कोहलीने खेळलेल्या फटक्याच्या माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावसकर प्रेमातच पडले.

सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतल्यानंतर कोहली मैदानात उतरला, रोहित शर्मासोबतच्या भागीदारीदरम्यान त्याने संघाचा डावही सावरला. नॅथन कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर विराटने सुरेख चौकार लगावला. हा फटका पाहिल्यानंतर समालोचन करत असलेल्या गावसकरांनी विराटची कशी स्तुती केली हे तुम्हीही ऐकाच…

दरम्यान पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 50 षटकात 236 धावांवर रोखलं.