भारताने उभ्या केलेल्या डोंगराऐवढ्या आव्हानाला उत्तर देताना सिडनी कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ गड्यांच्या मोबदल्यात २३६ धावांपर्यंत मजल मारली आहे. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी धाडला. कुलदीपने तिसऱ्या दिवशी ३ फलंदाजांना माघारी धाडलं.

“अगदी खरं सांगायला गेलं तर माझ्या शैलीत फारसा काही बदल झालेला नाहीये. आता कसोटी क्रिकेटचा मला चांगला अनुभव आला आहे, मात्र कसोटी क्रिकेटमध्ये अधिक परिपक्व होण्यासाठी मला अजुन थोडा वेळ लागणार आहे. जितका जास्त वेळ तुम्ही कसोटी क्रिकेट खेळाल तितका जास्त अनुभव तुम्हाला येतो.” कुलदीप यादव तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होता.

वन-डे आणि कसोटी क्रिकेट हे वेगवेगळं आहे. नेट्समध्ये सराव करताना तुम्हाला अनुभव मिळतो, मात्र प्रत्यक्ष सामना खेळणं हे एका गोलंदाजांसाठी कधीही फायद्याचं असतं, कुलदीप आपल्या अनुभवाबद्दल होता. चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया सध्या फॉलोऑनच्या छायेत आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज आणि कुलदीप यादव कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.