23 November 2020

News Flash

टीम इंडिया विरूद्धच्या ODI मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

पाहा कोणाला मिळाले १४ खेळाडूंच्या यादीत स्थान

ऑस्ट्रेलियाचा संघ जानेवारी २०२० मध्ये भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १४ जणांचा संघ जाहीर केला. या संघात नवोदित प्रतिभावंत फलंदाज मार्नस लाबूशेनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्याला वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत खेळताना दमदार कामगिरी केली आहे. त्याने या वर्षी खेळलेल्या १० कसोटी सामन्यात ६८.१३ च्या सरासरीने १ हजार २२ धावा केल्या.

२०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघातील एकूण ७ खेळाडूंना या संघातून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नियमित मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड हे हंगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

Video : बापरे..!! रोहितने मैदानावरच दिली पोलार्डला शिवी

मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतलेल्या ग्लेन मॅक्सवेलने टी २० क्रिकेटमधून पुनरागमन केले आहे, पण त्याला एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याशिवाय २०१९ विश्वचषकात संघातील उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, नॅथन कुल्टर नाईल, मार्कस स्टॉयनिस आणि नॅथन लायन यांनाही भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात संधी दिलेली नाही. तर जेसन बेहरेनडॉर्फ हा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

IND vs WI : “…म्हणून आम्ही हरलो”; विराटची प्रामाणिक कबुली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात १४ जानेवारीपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. पहिला सामना १४ जानेवारीला मुंबईत होणार आहे. तर दुसरा आणि तिसरा सामने अनुक्रमे १७ आणि १९ जानेवारीला राजकोट आणि बंगळूरु येथे पार पडणार आहे.

Video : जाडेजाच्या रन-आऊटवरून वाद; विराट म्हणतो….

ऑस्ट्रेलिया संघ – अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकोम्ब, अ‍ॅलेक्स कॅरे, पॅट कमिन्स, अ‍ॅश्टन टर्नर, मार्नस लाबूशेन, केन रिचर्डसन, जोश हेजलवूड, मिशेल स्टार्क, सीन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अगार, अ‍ॅडम झम्पा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 12:34 pm

Web Title: ind vs aus india vs australia odi squad for india tour declared by ca glenn maxwell marnus labuschagne vjb 91
Next Stories
1 पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धा : एमआयजी क्लबला विजेतेपद
2 युवा विश्वचषकाच्या तयारीसाठी प्रियमला ‘पृथ्वीमोला’चे मार्गदर्शन
3 मुंबई उपनगरची अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक
Just Now!
X