पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 277 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी केली. हनुमा विहारीच्या कामचलाऊ फिरकी गोलंदाजीने पहिल्या दिवशी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. मात्र पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने केलेला खेळ पाहता, दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना शिस्तबद्ध खेळ करण्याची गरज असल्याचं हनुमा विहारीने म्हटलं आहे.

“पहिल्या दिवसाच्या खेळात काय घडलं याचा विचार करण्याची वेळ आता निघून गेलीये. खेळामध्ये चढ-उतार येत असतात, त्याला तुम्ही काहीही करु शकत नाही. जर याचा विचार करणं टाळलं तर आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. दुसऱ्या दिवसाच्या खेळात आम्हाला अधिक शिस्तबद्ध फलंदाजी करण्याची गरज आहे. प्रत्येक चेंडू शांतपणे व संयम राखून खेळून काढावा लागणार आहे.” हनुमा विहारी सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होता.

पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २७७ धावा केल्या. सलामीवीर हॅरिस, फिंच आणि मधल्या फळीतील हेड या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली. शॉन मार्शनेही ४५ धावांची खेळी केली. ४ वेगवान गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या भारताला दिवसभरात सहा बळी टिपता आले. मात्र त्यापैकी २ गडी फिरकीपटू हनुमा विहारीने बाद करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

अवश्य वाचा – IND vs AUS : पर्थच्या मैदानात भारत कांगारुंच्या जाळ्यात फसला – ग्लेन मॅकग्रा