03 March 2021

News Flash

एकमेव कसोटीत कोहलीला विराट विक्रम करण्याची संधी

तर असा पराक्रम करणारा कोहली एकमेव

(संग्रहित छायाचित्र)

उद्या, १७ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषक आपल्याकडे ठेवण्यासाठी उतरेल तर ऑस्ट्रेलियाचा संघ २०१८ मधील पराभवचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. एडिलेड येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा भारतीय कर्णधार विराट कोहलीवर असतील. कारण विराट कोहली दौऱ्यातील आणि यंदाचा अखेरचा सामना खेळत आहे. २०२० या वर्षभरात विराट कोहलीला अद्याप एकही शतक झळकावता आलं नाही. २००८ नंतर आता २०२० मध्ये विराट कोहलीनं शतक न झळकवल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे वर्षाच्या अखेरच्या सामन्यात तरी विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.

आणखी वाचा- रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना, भारतासाठी दिलासादायक बातमी

पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करत विराट कोहली मोठा विक्रम आपल्या नावावर करु शकतो. विराट कोहलीनं शतकी खेळी केल्यास कर्णधार म्हणून विराट कोहलीचं हे ४२ वे आंतरराष्ट्रीय शतक असेल. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होणार आहे. आता हा विक्रम विराट-पॉटिंगच्या नावावर आहे. पाहूयात पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहली काय करतोय…

आणखी वाचा- रात्र ऑस्ट्रेलियाची आहे… Day Night कसोटीमधील कांगारुंचा विराट विक्रम भारताला धडकी भरवणाराच

पॉन्टिंगनं ३२४ सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करताना ४१ शतकं झळकावली आहेत. तर विराट कोहलीनं १८८ व्या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व करताना ४१ शतकं झळकावली आहेत. कोहलीनं कर्णधारपद करताना एकदिवसीय सामन्यात २१ शतकं झळकावली आहेत. तर कसोटी सामन्यात २० शतकं ठोकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 11:52 am

Web Title: ind vs aus indian captain virat kohli can go past ponting and achieve a world record in pink ball test nck 90
Next Stories
1 रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना, भारतासाठी दिलासादायक बातमी
2 सिक्सर किंग परत येतोय; युवराजचा पंजाब संघात समावेश
3 इशांतची उणीव जाणवेल!
Just Now!
X