22 September 2020

News Flash

कांगारुंना धक्का, महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

सरावादरम्यान झाली होती दुखापत

भारताविरुद्ध घरच्या मालिकेत मानहानीकारक पराभव स्विकारावा लागलेल्या ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिला टी-२० सामना मोठ्या दिमाखात जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने २ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र याआधीच ऑस्ट्रेलियन संघाचा महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे केन रिचर्डसन पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीये. ऑस्ट्रेलियन संघाचे फिजीओ डेव्हिड बिक्ली यांनी ही माहिती दिली.

अँड्रू टायची रिचर्डसनच्या जागी संघात निवड करण्यात आली आहे. आजचा टी-२० सामना झाल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ५ वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2019 3:46 pm

Web Title: ind vs aus injured kane richardson rules out of india tour
टॅग Ind Vs Aus
Next Stories
1 निवड समितीबद्दल आदर, पण माझ्या कामगिरीची दखल घ्यायला हवी – अजिंक्य रहाणे
2 महाराष्ट्र बास्केटबॉल संघटना बरखास्तीच्या मार्गावर?
3 भारताचे सहा बॉक्सर अंतिम फेरीत
Just Now!
X