चेतेश्वर पुजाराने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने, पहिल्या दिवसाअखेरीस 9 गड्यांच्या मोबदल्यात 250 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने सुरुवातीच्या सत्रात ऑस्ट्रेलियासमोर शरणागती पत्करली. सलामीवीर लोकेश राहुल, मुरली विजय माघारी परतल्यानंतर विराट कोहलीही पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. गलीमध्ये उभ्या असलेल्या उस्मान ख्वाजाने विराटचा एका हातात झेल पकडला.

“मी बॉलच्या दिशेने माझा हात बाहेर काढला आणि बॉल माझ्या हातात येऊन बसला. अशाप्रकारचे झेल हातात येतात तेव्हा बरं वाटतं.” चहापानाच्या विश्रांतीदरम्यान ख्वाजा फॉक्स स्पोर्ट्स वाहिनीशी बोलत होता. “पहिल्याच सत्रात आम्ही भारताच्या दोन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर विराटची विकेट जाणं आमच्यासाठी महत्वाचं होतं, आणि तसंच घडलं. त्यामुळे कधीकधी अशे कॅच हातात येणं वाईट नसतं.” त्यामुळे उद्याच्या दिवसात भारतीय संघ किती धावांची भर घालतो याकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : उस्मान ख्वाजाचा तो झेल पाहून कोहलीही झाला अवाक