17 January 2021

News Flash

सिडनी कसोटीवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व, स्मिथ-लाबुशेनची चिवट फलंदाजी

स्मिथ-लाबुशेन यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा १०० पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली.

मार्नस लाबुशेन आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या सिडनी कसोटी सामन्यावर कांगारुंनी आपलं वर्चस्व राखलं आहे. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्राअखेर ऑस्ट्रेलियाकडे २७६ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियानं चार गड्यांच्या मोबदल्यात १७६ धावा केल्या आहेत. स्टिव्ह स्मिथ ५८ आणि कॅमरुन ग्रीन २० धावांवर खेळत आहेत.

चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्राखेर ऑस्ट्रेलियानं सामन्यावर पकड मिळवली आहे. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियानं ३५ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या आहेत. स्मिथ आणि कॅमरुन ग्रीन सध्या खेळत आहेत. भारताकडून पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीनं लाबुशेन आणि मॅथ्यू वेडला बाद केलं. मात्र, चौथ्या दिवशी दुसऱ्या एकाही गोलंदाजाला यश मिळवता आलं नाही.

पहिल्या डावात फलंदाजी करताना रविंद्र जाडेजा आणि ऋषभ पंत जखमी झाले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणाला दोघेही आले नाहीत. पहिल्या डावात जाडेजानं चार बळी घेतले होते. जाडेजा गोलंदाजी करण्यासाठी नसल्यामुळे त्याचा अतिरिक्त भार इतर गोलंदाजावर पडल्याचं दिसलं. तसेच चौथ्या दिवशी भारतीय संघानं दोन झेल सोडल्याचा फटकाही बसल्याचं दिसलं. स्मिथ-लाबुशेन यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा १०० पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाचं हेच वैशिष्ट्य ठरलं आहे.

स्मिथनं लागोपाठ दुसऱ्या डावात ५० पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. बॉर्डर-गावसकर मालिकेत दोन्ही डावांत ५० पेक्षा जास्त धावा काढण्याची स्मिथची ही तिसरी वेळ आहे. सचिन आणि पाँटिंग यांनी प्रत्येकी ४-४ वेळा दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 7:14 am

Web Title: ind vs aus lunch in sydney steve smith has brought up his 30th test fifty and cameron green has been solid so far nck 90
Next Stories
1 महिलांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रात
2 देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ
3 जैव-सुरक्षेचा सोनेरी पिंजरा!
Just Now!
X