28 February 2021

News Flash

IND vs AUS : सरावादरम्यान मनीष आणि कुलदीपचं चाललंय तरी काय…

दौरा सुरू होण्याआधी खेळाडूंनी मैदानावर केला कसून सराव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ३ टी२० सामने, ४ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिका रंगणार आहेत. या दौऱ्यासाठी २-३ दिवसांपूर्वीच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. सामन्याआधी काही दिवस भारताच्या संघाला तेथील खेळपट्ट्या आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेता यावे, म्हणून खेळाडूंनी मैदानावर सराव केला. या दरम्यानचे काही क्षण खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. त्यात एका फोटोमध्ये फलंदाज मनीष पांडे आणि फिरकीपटू कुलदीप यादव चक्क मारामारी करत आहेत की काय, असे वाटत आहे.

कुलदीप यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून मनीष पांडे आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये कुस्तीचा सामना रंगला आहे की काय, अशी शंका कोणालाही येऊ शकते. मात्र कुलदीपने या फोटोखाली कॅप्शन लिहून साऱ्यांचे शंकानिरसन केले आहे. ‘मैदानावर जेव्हा मनीष मला स्ट्रेचिंगचा सराव देत असतो, त्यावेळी मी आणि मनीष मारामारी करत आहोत की काय अशी शंका लोकांना येते. पण तसे काही नाही. याउलट गॅब्बा येथे मनीष बरोबर स्ट्रेचिंगचा सराव करताना मजा आली आणि ताजेतवाने वाटले, असे त्याने स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, कुलदीप यादवचा भारताच्या टी२० आणि कसोटी अशा दोनही संघात समावेश आहे. तर मनीषला केवळ टी२० संघात स्थान मिळवता आलेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 12:48 pm

Web Title: ind vs aus manish pandey and kuldeep yadav stretching during practice which makes look them like fighting
Next Stories
1 IND vs AUS : रोहितच्या फलंदाजीमुळे मॅक्सवेलला भरली धडकी, म्हणाला…
2 BCCI म्हणते, ते वृत्त खोटेच!; आम्ही विराटला कोणतीही वॉर्निंग दिलेली नाही
3 विराट कोहली ऑस्ट्रेलियात गप्प बसला तर आश्चर्य वाटेल – पॅट कमिन्स
Just Now!
X