ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचा तिसरा दिवस गोलंदाजाच्या नावावर राहिला. तिसऱ्या दिवशी दोन्ही संघाच्या मिळून १५ विकेट पडल्या. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा संघ बाद केला तर कांगारूंच्या गोलंदाजांनी पलटवार करत भारताचा अर्धा संघ तंबूत झाडला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. विदेशामध्ये १०० बळी घेण्याचा पराक्रम शामीने केला आहे. या विक्रमासह शामी कपिल देव – जवागल श्रीनाथ यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

पेन आणि पॅट कमिन्स ही जमलेली जोडी भारताची डोकेदुखी ठरेल असे वाटत होते. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीने ६१ व्या षटकांत जलदगती गोलंदाज शमीला पाचारण केले. शामीने टिच्चून मारा करताना कमिन्सला बाद केले. या एकमेव बळीसह शामीने परदेशात बळींचे शतक साजरे केले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दहावा गोलंदाज आहे. शामीसह भारताच्या पाच जलदगती गोलंदाजांनी परदेशात शंभर विकेट घेतल्या आहेत.

शामीने ३९ व्या कसोटीत १४० बळी घेतले आहे. यामधील मायदेशातील ११ कसोटीत ४० तर विदेशातील २८ व्या कसोटीत १०० बळी घेतले आहे. शामीने आधिकाधिक कसोटी सामने विदेशात खेळले आहेत.

विदेशात १०० बळी घेणारे पाच वेगवान गोलंदाज

 नाव              सामने        बळी
कपिल देव           ६६          २१५
जहीर खान          ५४          २०७
इशांत शर्मा          ५७          १८०
जवागल श्रीनाथ     ३५          १२८
मोहम्मद शामी      २८         १००