सिडनी कसोटी सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी भारतीय संघाकडून ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा सामना केला. मात्र संघाचा पराभव ते टाळू शकले नाहीत. रोहितने १३३ धावा केल्या तर धोनीने ५१ धावांची खेळी केली. यादरम्यान धोनीने वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. मात्र यावेळी धोनीच्या खात्यात आणखी एका संथ खेळीची नोंद झाली.

धोनीने तब्बल ९३ चेंडू खर्च करुन ५० धावा काढल्या. हे अर्धशतक त्याचं वन-डे क्रिकेटच्या इतिहासातलं दुसरं संथ अर्धशतक ठरलं आहे. याआधी २०१७ साली धोनीने विंडीजविरुद्ध १०७ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. मात्र अर्धशतक झळकावल्यानंतर अवघी १ धाव काढल्यानंतर धोनी माघारी परतला. त्याने ९६ चेंडूत ५१ धावा केल्या. मधल्या षटकात याच संध धावगतीचा भारताला फटका बसला.

अवश्य वाचा – IND vs AUS : एक धाव आणि धोनी मानाच्या पंक्तीत, वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण