भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले. भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळले आणि विकेट्स गमावल्या. केवळ चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली आणि भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
या सामन्यात केवळ चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत शतकी खेळी केली आणि भारताला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. पुजाराने १२३ धावांची झुंजार खेळी केली. मात्र पुजाराच्या खेळीपेक्षा तो ज्या पद्धतीने बाद झाला, ती बाब अधिक चर्चिली गेली. पॅट कमिन्सने चेंडू अडवून हवेत असतानाच तो स्टंपवर मारला आणि त्याचा निशाणा अचूक लागला.
Unreal. This is simply stunning from @patcummins30, especially after sending down 19 rapid overs on a blazing hot Adelaide day!#AUSvIND | @Toyota_Aus pic.twitter.com/APvK1GYBRd
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2018
पुजारा धावचीत झाल्यांनतर कमिन्सच्या तंदुरुस्तीचे आणि फेकीचे (थ्रो) चांगलेच कौतुक झाले. दरम्यान, पुजाराने २३९ चेंडूत ६ चौकारांच्या आणि १ षटकाराच्या साहाय्याने शतक पूर्ण केले. एकीकडे भारताचे इतर फलंदाज बाद होत असताना पुजाराने मोठे फटके मारण्याचा मोह आवरला. त्यामुळे पुजाराने शतक झळकावले. पुजाराच्या या अप्रतिम खेळीमुळे पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५ हजार धावांचा टप्पा गाठला. ५ हजार कसोटी धावा करणारा पुजारा १२ वा भारतीय खेळाडू ठरला.
First Published on December 6, 2018 5:17 pm