28 September 2020

News Flash

IND vs AUS : ऋषभ पंत ‘शंभर नंबरी’ सोनं; केला धोनीलाही न जमलेला पराक्रम

पहिल्याच डावात भारताची ५०० धावांच्या पार मजल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथी आणि अंतिम कसोटी सुरु आहे. या कसोटीत भारताने पहिल्याच डावात ५०० धावांच्या पार मजल मारली आहे. पुजाराने केलेल्या १९३ धावांच्या जोरावर भारताने सामन्यावर पकड मिळवली. त्याबरोबरच फलंदाजीच्या शैलीवरून टीका होणाऱ्या ऋषभ पंतलादेखील सूर गवसला. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपले पहिले शतक ठोकले आणि असा पराक्रम करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मान मिळवला.

विहारीने पुजाराला चांगली साथ दिली. पण विहारी ४२ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंत मैदानावर आला. ऋषभने १३८ चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने ९ चौकार लगावले. यासह पंत ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला.

 

या व्यतिरिक्त पुजाराने उत्तम खेळी केली. पण कारकिर्दीतील पहिले द्विशतक ठोकणे त्याला शक्य झाले नाही. पुजाराने ३७३ चेंडूत १९३ धावा लगावल्या. या लहेलीत त्याने २२ चौकार लगावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 10:42 am

Web Title: ind vs aus rishabh pant becomes the first indian wicket keeper to score a hundred in australia
Next Stories
1 भारताविरुद्ध वन-डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा
2 IND vs AUS : द्विशतक हुकलं मात्र पुजाराच्या नावावर विक्रमांचा षटकार
3 रोहित शर्माने शेअर केला मुलीचा गोंडस फोटो
Just Now!
X