ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताची दुसऱ्या डावात ५ बाद ५४ अशी तारांबळ उडाली. पण तरीदेखील पहिल्या डावात घेतलेल्या २९२ धावांच्या आघाडीमुळे भारत अद्यापही सामन्यात वरचढ आहे. ही कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक आहे. याच मालिकेत भारताचा यष्टिरक्षक ऋषभ पंतनेही लक्षवेधी कामगिरी करत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे.

‘तू शतक ठोक, मी अंबानींशी बोलतो’; रोहितची ऑस्ट्रेलियन कर्णधाराला ऑफर

ऋषभ पंत याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिमागे दमदार कामगिरी करताना बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विक्रमाची नोंद केली. शुक्रवारी त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा झेल टिपला. या मालिकेतील त्याचा हा १८वा झेल ठरला. या बरोबर तो एका मालिकेत सर्वाधिक झेल टिपणारा भारतीय यष्टिरक्षक ठरला आहे.

 

पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ३ कसोटी सामन्यांत १८ झेल टिपले आहेत. त्याने या कामगिरीसह सय्यद किरमाणी आणि महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला. या दोघांनी प्रत्येकी १७-१७ झेल टिपले होते. मुख्य म्हणजे किरमाणी यांना १७ झेलसाठी ६ कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागली होती, तर धोनीने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १७ झेल पकडले होते. पण पंतने केवळ तीन सामन्यांत हा पराक्रम केला. पंतने पहिल्या कसोटीत ११, दुसऱ्या कसोटीत ४ आणि या कसोटीत तीन झेल घेतले.