मेलबर्न कसोटी सामन्यात विजयी झाल्यानंतर टीम इंडिया आता आगामी कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. नवीन वर्षात ७ जानेवारीपासून भारतीय संघ सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्मा संघात संघात दाखल झाला आहे.

इतकच नव्हे तर सिडनीत दाखल झाल्यानंतर रोहितने आपला फिटनेस सुधारण्याच्या दृष्टीकोनातून संघाचे फिजीओ व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला सुरुवातही केली आहे. बीसीसीआयने ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे.

आणखी वाचा- सिडनी कसोटीत मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याचे संकेत

आयपीएलचा तेरावा हंगाम खेळत असताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. यानंतर रोहितने भारतात परतून बंगळुरु येथे NCA मध्ये आपला फिटनेस सुधारण्याकडे भर दिला. ११ डिसेंबर रोजी झालेली फिटनेस टेस्ट पास करत रोहित शर्मा शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात दाखल झाला आहे.