भारतीय संघाचा पहिला डाव २५० धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भारताने दहावा गडी गमावला. या डावात भारताकडून सर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा याने केल्या. त्याने २४६ चेंडूत १२३ धावांची अतिशय संयमी खेळी साकारली. एकीकडे भारताचे गडी बाद होत असताना त्याने छोट्या छोट्या भागीदारी करत भारताला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. त्याच्या या खेळीची सर्वत्र प्रशंसा झाली. मुख्य म्हणजे क्रिकेटमधील महान माजी खेळाडूनीही त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने ट्विट करत पुजाराचे कौतुक केले. ज्या परिस्थितीमध्ये पुजाराने शतक ठोकले, ते खरंच कौतुकास्पद आहे. या मालिकेत अशी अनेक शतके तुझ्या बॅटमधून पाहण्याची अपेक्षा आहे, असे सचिनने ट्विट केले आहे.

भारताच्या कसोटी इतिहासात आपला वेगळा ठसा उमटवलेला व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही पुजाराची स्तुती केली.

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने हटके अंदाजात पुजाराची पाठ थोपटली.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मुडी यानेही पुजाराला शाबासकी दिली.