24 November 2020

News Flash

Ind vs Aus : धवन असतानाही रोहित-राहुलची जोडी उतरली सलामीला, जाणून घ्या कारण…

अखेरच्या सामन्यात घडला अनोखा बदल

बंगळुरुच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना २८६ धावांपर्यंत मजल मारली. स्टिव्ह स्मिथचं शतक आणि लाबुशेनने त्याला अर्धशतक करत दिलेली उत्तम साथ या जोरावर कांगारुंनी सन्मानजनक धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघ धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, त्यावेळी एक बदल पहायला मिळाला.

सलामीवीर शिखर धवनच्या ऐवजी लोकेश राहुल पहिल्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. शिखर धवनच्या खांद्याला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाल्यामुळे त्याला एक्स-रे काढण्यासाठी बाहेर नेण्यात आलेलं आहे. यामुळे धवन ऐवजी राहुलला सलामीच्या जागेवर संधी देण्यात आली. धवनच्या दुखापतीबद्दल नेमकी माहिती मिळत नसल्यामुळे त्याच्या भविष्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

खांद्याला दुखापत झाल्यानंतर फिजीओसोबत मैदानाबाहेर जाताना शिखर धवन

 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्माने अवघ्या ४ धावा काढत वन-डे क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

अवश्य वाचा – Ind vs Aus : अवघ्या ४ धावांत ‘हिटमॅन’चा विक्रम, गांगुली-सचिनला टाकलं मागे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 6:22 pm

Web Title: ind vs aus shikhar dhawan gest injured while fielding lokesg rahul opens batting for team india psd 91
Next Stories
1 Mumbai Marathon 2020 : इथिओपियाच्या धावपटूंनी मारली बाजी
2 Ind vs Aus : अवघ्या ४ धावांत ‘हिटमॅन’चा विक्रम, गांगुली-सचिनला टाकलं मागे
3 U-19 World Cup : पहिल्याच सामन्यात भारताकडून ‘लंकादहन’
Just Now!
X