मेलबर्न कसोटीत भारतीय संघाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत यजमान ऑस्ट्रेलियाला चांगला धक्का दिला. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पुरता कोलमडला. आपल्या संघाची झालेली तऱ्हा पाहता मेलबर्नच्या मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी मग भारतीय संघाला आपल्या शेरेबाजीने लक्ष्य करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी स्टँडमध्ये बसून भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल काही अपशब्दही वापरले. एरवी आपल्या तापट स्वभावासाठी ओळख्या जाणाऱ्या विराटने मात्र यावेळी शेरेबाजी करणाऱ्यांना वेगळ्या पद्धतीने समर्पक उत्तर दिलं. त्याची ही कृती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते आहे.

विराटच्या या कृतीवर नेटीझन्सही भलतेच खुश झाले असून त्यांना विराटचं हे आगळंवेगळं रुप आवडलेलं आहे.