Ind vs Aus: Steve Smith century against Australia : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या दमदार शतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकांत ३७४ धावांचा डोंगर उभा केला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्मिथनं ६२ चेंडूत शतकी खेळी केली. स्मिथचं करिअरमधील हे दहावं शतक आहे तर भारताविरोधात चौथं शतक आहे. १२६ व्या एकदिवसीय सामन्यात स्मिथचं दहावं शतक आहे.

स्मिथनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६६ चेंडूत चार षटकार आणि ११ चौकाऱ्यांच्या मदतीनं १०५ धावांची खेळी कली. स्मिथनं ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय सामन्यात तिसरं वेगवान शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलनं सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. मॅक्सवेलनं फक् ५१ चेंडूत शतकी खेळी केली होती. दुसऱ्या क्रमांकावर जेम्स फॉक्नर आहे. फॉकनरनं ५७ चेंडूत शतकी खेळी केली होती. स्मिथनं ६२ चेंडूत शतक झळकावलं आहे. स्मिथच्या एकदिवसीय करिअरमधील हे सर्वात वेगवान शतक आहे.


स्मिथशिवाय पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार फिंचने एकदविसीय करिअरमधील १७ वे शतक झळकावत ११४ धावांची खेळी केली. तर वॉर्नरनं ६९ धावांची अर्धशतकी खेळी केली. मॅक्सवेलनं १९ चेंडूत झटपट ४५ धावा चोपल्या. यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे.