19 September 2020

News Flash

IND vs AUS : राहुलला पहिले संघाबाहेर काढा; सुनील गावसकर विराटवर भडकले

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावरही केली टीका

सुनील गावसकर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या कसोटी मालिकेत सध्या १-१ बरोबरी आहे. भारताने पहिला सामना ३१ धावांनी जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना शंभराहून अधिक धावांनी जिंकत मालिकेत पुनरागमन केले. भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यातील विजयानंतर उंचावलेला आत्मविश्वास पर्थ कसोटीत डळमळीत झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर टीका केली आहे.

भारतीय संघाची सलामी जोडी अत्यंत वाईट खेळत आहे. असे असूनही दुसऱ्या कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सलामी जोडीत बदल करण्याबाबत कोहलीने नकारात्मक उत्तर दिले. याबाबत ‘आज तक’शी बोलताना गावसकर म्हणाले की माझ्या मते संघात २ बदल आवश्यक आहेत. वर्षभर खराब कामगिरी करणाऱ्या राहुलला संघाबाहेर काढायला हवे आणि त्याचा जागी मयंक अग्रवालला संधी मिळायला हवी. तसेच उमेश यादवला संघाबाहेर करून अश्विनला संघात जागा द्यायला हवी.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत १४६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशा बरोबरीत आणण्यात यश मिळवले. भारतीय संघाच्या या पराभवानंतर यासाठी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री जबाबदार असल्याचेही गावसकर यांनी म्हटले आहे.

पुढील दोन कसोटी सामन्यांत भारताला विजय मिळवता आला नाही, तर कोहली आणि शास्त्री यांची योग्यतेचे मूल्यांकन करावे लागेल, असे ठाम मत गावसकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की संघ निवडताना व्यवस्थापन नेहमी चूक करते. हे दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून सुरु आहे आणि त्याचा संघाला फटका बसत आहे. पर्थ कसोटीत योग्य संघ निवड केली असती, तर सामना जिंकता आला असता. सलामीची समस्या, गोलंदाजांची निवड याचा विचार करण्याची जबाबदारी निवड समिती एवढीच कर्णधार आणि प्रशिक्षकाचीही असते. त्यावर तोडगा काढला तरच भारत पुढील दोन्ही सामने जिंकू शकेल.

स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितही भारताला विजय मिळवता येत नसेल, तर त्याचा विचार निवड समितीने नक्की करायला हवा, असेही गावसकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 7:41 pm

Web Title: ind vs aus sunil gavaskar says keep rahul out of the playing xi of team india
Next Stories
1 IPL Auction 2019 : युवराज ‘मुंबईकर’ झाल्यावर सचिन म्हणतो…
2 WBBL : अबब! सर्वात जलद शतक ठोकून महिला क्रिकेटपटूने केला विक्रम
3 IPL Auction 2019 – जाणून घ्या कोणी विकत घेतले कोणते खेळाडू?
Just Now!
X