ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत पहिले २ सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ तिसऱ्या वन-डे सामन्यासाठी रांचीमध्ये दाखल झाला आहे. शुक्रवारी रांचीत भारतीय संघ तिसरा सामना खेळणार आहे. यावेळी विमानतळावर टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. आपल्या लाडक्या धोनीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी चाहत्यांची विमानतळावर झुंबड उडाली होती.

धोनी आपल्या घरच्या मैदानावर हा सामना खेळणार असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. वन-डे विश्वचषकाआधी टीम इंडियाची ही अखेरची वन-डे मालिका असणार आहे, त्यामुळे या मालिकेत विजय मिळवून विश्वचषकात सकारात्मक मानसिकतेने जाण्याकडे भारतीय संघाचा कल असणार आहे.

अवश्य वाचा – तुमचं भविष्य उज्वल आहे, शास्त्री गुरुजींकडून टीम इंडियाचं कौतुक