भारताने चौथ्या कसोटी मालिकेत पहिल्या डावात ६२२ धावांवर डाव घोषित केला आणि सामन्यावर पकड मिळवली आहे. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांच्या दीडशतकी खेळाच्या जोरावर भारताने ही मजल मारली. या दोघांशिवाय मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली. भारताच्या या पराक्रमामुळे भारताने सिडनीच्या मैदानावर इंग्लंड आणि विंडीज या संघांना मागे टाकले.

भारताने ऑस्ट्रेलियात ७१ वर्षात एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. या चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. सध्या सुरु असलेल्या चौथ्या सामान्यतही भारताने पहिल्याच डावात ६२२ धावांचा डोंगर उभारला आहे. सिडनीच्या मैदानावर ६००हून अधिक धावा करण्याची ही भारताची तिसरी वेळ ठरली. या पराक्रमामुळे भारताने इंग्लंड आणि विंडीज यांना मागे सोडले. सिडनीच्या मैदानावर इंग्लंडने २ वेळा ६०० हून अधिक धावा केल्या होत्या, तर विंडीजने ही कामगिरी एकदा केली आहे.

 

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयी होण्यासाठी ६२२ धावांपेक्षा जास्त धावा करून भारताला पुन्हा एकदा बाद करावे लागेल. सामन्यातील केवळ ३ दिवसांचा खेळ शिल्लक असताना ही बाब घडणे अतिशय कठीण आहे. त्यामुळे हा सामना भारत जिंकू शकतो किंवा अनिर्णित राहू शकतो. अशा परिस्थितीत भारत ऑस्ट्रेलियात ७१ वर्षांमधील आपला पहिलावहिला कसोटी मालिका विजय नोंदवू शकतो.