News Flash

Video : ऑस्ट्रेलियात आली ‘रहाणे दादा’ अशी मराठमोळी हाक आणि…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून तिसरी कसोटी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येईल. या सामन्याआधी भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आपल्या फलंदाजीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे. पण या दरम्यान एका फॅनने टाकलेला व्हिडीओ भाव खाऊन जात आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भावना शिवरे या फॅनने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला फॅन अजिंक्य रहाणे याला ‘रहाणे दादा’ अशी मराठमोळी हाक मारली. त्यावर रहाणेनेही तिला हात हलवून तिच्या हाकेचा स्वीकार केला.

 

याशिवाय, रहाणेने सराव सत्रानंतर सर्व बाटल्या आणि इतर कचरा आवरून ठेवल्याचेही तिने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे.

दरम्यान, या कसोटी सामन्यात आम्ही पुनरागमन करु याची मला खात्री आहे. ज्या पद्धतीने मी पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करत आहे, ते पाहता तिसऱ्या सामन्यात मी शतकी किंवा द्विशतकी खेळी करेन असा मला आत्मविश्वास वाटतोय. फक्त शतक झळकावयचं आहे याचा विचार करत राहणं मला टाळायचं आहे. ज्या पद्धतीने मी फलंदाजी करतोय तशाच पद्धतीने मला फलंदाजी करणं सुरु ठेवायचंय. मला परिस्थितीचा अंदाज येतोय, त्यानुसार गरज असेल तर आक्रमक आणि गरज असेल तर बचावात्मक खेळ मी करतोय. असाच खेळ करत राहिलो तर माझ्या संघाला याचा फायदा होईल, वैय्यक्तिक विक्रम नंतर साध्य करता येतात’, असे अजिंक्यने आपल्या फलंदाजीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 6:54 pm

Web Title: ind vs aus video of female fan calling ajinkya rahane as rahane dada
Next Stories
1 IND vs AUS : विराट पृथ्वीवरील सर्वोत्तम क्रिकेटपटू – शेन वॉर्न
2 Flashback 2018 : भारतीय कबड्डीला गांभीर्याने विचार करायला लावणारं वर्ष
3 IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीआधी विराट चिंतेत, जाणून घ्या कारण
Just Now!
X