25 January 2021

News Flash

IND vs AUS: “विराट कोहलीची टीम इंडियामधील अनुपस्थिती म्हणजे…”

ऑस्ट्रेलियन माजी प्रशिक्षकाचं रोखठोक मत

IPL चा हंगाम संपल्यानंतर आता साऱ्यांना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली असून नियमांनुसार क्वारंटाईनमध्ये आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्याची सुरूवात वन-डे आणि टी २० मालिकेने होणार आहे. तर सांगता कसोटी मालिकेने होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर कोहली मायदेशी परतणार आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी पत्नीसोबत राहण्यासाठी त्याने पालकत्व रजा घेतली आहे. याच मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुचानन यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

प्रेमाच्या पिचवर आणखी एक क्रिकेटपटू ‘क्लीन बोल्ड’; साखरपुड्याचे फोटो केले शेअर

“विराट कोहलीची टीम इंडियामधील अनुपस्थिती म्हणजे ऑस्ट्रेलियासाठी वरदानच आहे. कोहली हा सामन्यावर वर्चस्व राखणारा खेळाडू आहे. गेल्या वेळी जेव्हा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका झाली, तेव्हा विराटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला होता. कसोटी मालिकेचा हिरो चेतेश्वर पुजारा ठरला असला तरी कोहलीची मैदानावरील उपस्थिती खूप महत्त्वाची होती. सामन्यात आणि ड्रेसिंग रूममध्ये विराटची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल”, असे बुचानन टीओआयशी बोलताना म्हणाले.

“सूर्यकुमार, तुझी लाज वाटते…”; ‘त्या’ प्रकारानंतर क्रिकेटपटूवर जोरदार टीका

“गेल्या वेळच्या ऑस्ट्रेलियन कसोटी संघाशी सध्याच्या संघाची तुलना केल्यास एक गोष्ट नक्की सांगता येईल की आताचा संघ भक्कम आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ या जोडीकडे प्रचंड अनुभव आहे. मार्नस लबूशेन सध्या कमालीच्या फॉर्मात आहे. इतरही फलंदाज आपापली भूमिका चोख पार पाडत आहेत, पण वॉर्नर-स्मिथ जोडीमुळे ऑस्ट्रेलियन संघाला विशेष बळ मिळेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 12:03 pm

Web Title: ind vs aus virat kohli absence in team india is advantage for australian team says former coach john buchanan vjb 91
Next Stories
1 IND vs AUS: क्रिकेट मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला धक्का; वेगवान गोलंदाजाची माघार
2 अन् सूर्यकुमार यादवनं केली विराटची स्तुती
3 रोहित, विराटला स्थान नाही; इरफानच्या संघाचा पोलार्ड कर्णधार
Just Now!
X