India Vs Australia : कॅप्टन कूल एम. एस. धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण आजही चाहते आणि खेळाडू धोनीला विसरले नाहीत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि कोच यांनी सामन्यात धोनीबद्दल वक्तव्य केल्याचं ताजं असतानाच आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सिडनी येथील दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान भारतीय संघाचे चाहते धोनीच्या नावाचा बोर्ड घेऊन स्टेडिअममध्ये पोहचले होते. यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं दिलेल्या प्रतिक्रेयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे ट्विटरवर #MSDhoni हा ट्रेंड होत आहे.

भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना कर्णधार विराट कोहली सिमारेषावर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी विराट कोहलीची नजर स्टेडिअममधील काही चाहत्यांवर पडली. या चाहत्यांच्या हातात Miss You MS Dhoni असं पोस्टर होतं. हे पोस्टर पाहून त्यांच्याकडे इशारा करत कोहलीनेही धोनीला खूप मिस करत असल्याच सांगितलं. यावेळी चाहते वांरवार धोनी-धोनी नावाचा जयघोष करत होते. धोनीच्या निवृत्तीनंतर विराटनं पहिल्यांदाच मैदानावर अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओला एका चाहत्यांनं ट्विटर पोस्ट केलं होतं. अल्पावधीच हा व्हिडीओ व्हायरल झाला.

पाहा व्हिडीओ –

व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट झाल्यानंतर काहीवेळातच #MSDhoni हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. विराट कोहलीच्या या प्रतिक्रियेनं चाहते खूश झाले असून विराट कोहलीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

भारतीय संघानं एकदिवसीय मालिका २-१ ने गमावल्यानंतर टी-२० मालिकेत दमदार पुनरागमन केलं आहे. तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत भारतीय संघ २-० नं आघाडीवर आहे. आज, मंगळवारी तिसरा आणि अखेरचा सामना होणार आहे.