01 March 2021

News Flash

कोहलीचा विजयरथ घरच्या मैदानातच अडखळला

15 मालिकांची विजयी घौडदौड संपुष्टात

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला, बुधवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर एका नकोश्या विक्रमाला सामोरं जावं लागलं. 2 टी-20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने बाजी मारत विराट कोहलीचा विजयरथ थांबवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असताना कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मालिकेत पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत घरच्या मैदानावर 16 मालिका खेळला आहे. यापैकी 15 मालिकांमध्ये भारताने विजय तर एका मालिकेत बरोबरी साधली आहे.

फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने 11 वर्षांत प्रथमच भारताला टी-20 मालिकेत पराभूत करण्याचा विक्रम केला आहे. भारताने दिलेलं 191 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. टी-20 मालिकेनंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – राहुल द्रविडमुळेच यशस्वी पुनरागमन करु शकलो – लोकेश राहुल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 2:50 pm

Web Title: ind vs aus virat kohlis 15 series win strike comes to an end after loss in 2nd t20i
टॅग : Ind Vs Aus,Virat Kohli
Next Stories
1 Video : ४६ षटकार, ८०७ धावा! इंग्लंड-विंडीजच्या फलंदाजांची ही आतषबाजी एकदा पाहाच
2 IND vs AUS : मालिका गमावली, पण विराटने रचला विश्वविक्रम
3 राहुल द्रविडमुळेच यशस्वी पुनरागमन करु शकलो – लोकेश राहुल
Just Now!
X