27 February 2021

News Flash

IND vs AUS : भारतीय संघ एका विजयाने खूश होणार नाही – विराट कोहली

मालिकाविजय हे आमचं उद्दीष्ट !

कर्णधार विराट कोहली

मेलबर्न कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ पुरता कोलमडला. मात्र पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन यांनी उरलेल्या दिवसाचा खेळ आपली विकेट टिकवून ठेवत भारताचा विजय पाचव्या दिवसावर ढकलला. अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात पावसामुळे एक सत्र वाया गेल्यामुळे अनेक भारतीय चाहत्यांच्या मनात धकधक होतं होती, मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. यावेळी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघातील शेपटाला फारशी वळवळ करण्याची संधी न देता सामन्यात बाजी मारली. कर्णधार विराट कोहलीनेही पत्रकार परिषदेदरम्यान आपल्या संघाचं तोंडभरुन कौतुक केलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम गोलंदाज – विराट कोहली

“या एका विजयामुळे खूश होऊन आम्ही येथे थांबणार नाहीयोत. या विजयामुळे आमच्या आत्मविश्वासात भर पडली असून सिडनी कसोटी सामन्यात आम्ही अधिक सकारात्मक पद्धतीने खेळू. ज्या दोन सामन्यांमध्ये आम्ही विजय मिळलाय, त्या सामन्यात आम्ही प्रत्येक बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या वरचढ होतो. या कारणासाठी आम्ही मालिका विजयाचे प्रबळ दावेदार आहोत, मात्र आमचं सगळं काम अजुन संपलेलं नाहीये. अखेरची सिडनी कसोटी जिंकून ही मालिका जिंकण्याकडे आमचा कल असणार आहे.” विराट पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता.

अवश्य वाचा – IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीतले हे 11 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 3:45 pm

Web Title: ind vs aus we are not going to stop here says virat kohli
टॅग : Ind Vs Aus,Virat Kohli
Next Stories
1 Flashback 2018 : क्रीडा क्षेत्रातील या सहा निकालांनी वेधून घेतलं जगाचं लक्ष
2 IND vs AUS : कोहली-पुजाराला बाहेर बसवलं तर भारताचीही परिस्थिती बिकट होईल – टीम पेन
3 IND vs AUS : जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम गोलंदाज – विराट कोहली
Just Now!
X