विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर मात केली. १ डाव आणि १३० धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेत १-० ने आघाडी केली. सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या मयांक अग्रवालला सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. कर्णधार विराट कोहलीनेही सामना संपल्यानंतर मयांकचं कौतुक केलं.

मयांकने शतक झळकावल्यानंतर विराटने ड्रेसिंग रुममधून खूण करत मयांकला द्विशतक कर असं सांगितलं. याबद्दल विचारलं असतान विराट म्हणाल,”एका सामन्यात सर्वोच्च धावसंख्येचं महत्व काय आहे हे मला माहिती आहे. मयांकने मोठी खेळी करावी अशी माझी इच्छा होती. संघाला अनुभवी खेळाडू म्हणून त्याने सावध खेळ करावा असं मला वाटत होतं, मी ज्या चुका केल्या त्या इतरांनी कराव्यात अशी माझी इच्छा नाहीये.”

अवश्य वाचा – IND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय ! कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड

मयांकने पहिल्या डावात ३३० चेंडूत २४३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत २८ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. या द्विशतकी खेळीदरम्यान मयांकने अनेक विक्रमही मोडले. या मालिकेतला दुसरा सामना २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचा हा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे.