26 February 2020

News Flash

IND vs BAN : माझी स्पर्धा माझ्याशीच ! रोहित शर्मा ठरतोय षटकारांचा बादशहा

रोहितची दुसऱ्या टी-२० त ८५ धावांची खेळी

राजकोटच्या मैदानात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताना ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने भारताला विजयासाठी १५४ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरादाखल रोहित शर्माने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत ८५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.

गेल्या काही वर्षांत रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचा पाऊस पाडतो आहे. २०१७ सालपासून रोहित शर्माची आकडेवारी पाहिली की त्याच्या खेळातल्या आक्रमकतेचं सर्वांना परिचय येईल.

दरम्यान रोहित शर्माला शिखर धवनने ३१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या मालिकेतला अखेरचा सामना १० तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – शतकी टी-२० सामना खेळणारा रोहित पहिला भारतीय, जाणून घ्या पहिल्यांदा शंभरावी कसोटी आणि वन-डे खेळणारे भारतीय

First Published on November 8, 2019 8:53 am

Web Title: ind vs ban 2nd t20i rohit sharma hitting sixes in international cricket swiftly know stats here psd 91
Next Stories
1 Video : डोकेदुखी ठरलेला मुश्फिकूर सापळ्यात अडकला…
2 ऑलिम्पिकच्या तयारीसाठी प्रो लीग फायद्याची -रुपिंदर
3 सात्त्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत!
Just Now!
X