बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं १५४ धावांचं आव्हान भारताने रोहित आणि शिखरच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पूर्ण केलं. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावा जोडल्या. टी-२० क्रिकेटमध्ये रोहित आणि शिखर धवन जोडीची ही चौथी शतकी भागीदारी ठरली आहे. आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही सलामीच्या जोडीला रोहित-शिखर जोडीसारखी कामगिरी करता आलेली नाही.

रोहित शर्माने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत ८५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. रोहित शर्माला शिखर धवनने ३१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या मालिकेतला अखेरचा सामना १० तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : माझी स्पर्धा माझ्याशीच ! रोहित शर्मा ठरतोय षटकारांचा बादशहा