X
X

IND vs BAN : विराट-रोहितच्या शर्यतीत पुन्हा विराटचीच बाजी !

पुजारासोबत विराटची महत्वपूर्ण भागीदारी

कोलकाता कसोटीत बांगलादेशला पहिल्या डावात १०६ धावांवर गारद केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताने आपले ३ फलंदाज गमावले, मात्र पुजारा आणि कोहलीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने सामन्यात आघाडी घेतली. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर पुजारा आणि कोहली यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

चेतेश्वर पुजारा ५५ धावांची खेळी करुन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटनेही आपलं अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान विराटने रोहित शर्माला माघारी टाकलं आहे. २०१९ वर्षात सर्वाधीक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता पहिल्या स्थानावर आला आहे.याचसोबत, कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ५ हजार धावा काढणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने ८६ डावांमध्ये ही कामगिरी करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटींगने ९७ डावांमध्ये याआधी अशी कामगिरी करुन दाखवली होती.

अवश्य वाचा – IND vs BAN : विराटचा विक्रम, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

24

  • Tags: ind vs ban, virat-kohli,
  • Just Now!
    X