23 September 2020

News Flash

IND vs BAN : सबकुछ इशांत शर्मा ! ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत सर्वोत्तम कामगिरीची नोंद

बांगलादेशचा निम्मा संघ केला गारद

गोलंदाजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारताने कोलकाता कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपला. भारतीय संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दिवस-रात्र कसोटी सामना होता. इशांत शर्माने या सामन्यात आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

भारताकडून दिवस-रात्र वन-डे सामन्यात पहिल्यांदा पाच बळी घेण्याचा मान अनिल कुंबळेच्या नावावर आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ही कामगिरी कुलदीप यादवने करुन दाखवली आहे. यानंतर दिवस-रात्र कसोटी सामन्यात इशांतने अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

इशांतने शर्माने सामन्यात ५, उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेतले.

अवश्य वाचा – IND vs BAN : मायदेशात खेळताना इशांतला सूर सापडला, निम्मा संघ केला गारद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 6:14 pm

Web Title: ind vs ban 2nd test kolkata ishant sharma creates history in 1st day and night test psd 91
Next Stories
1 IND vs BAN : इडन गार्डन्सवर भारतीय गोलंदाजांकडून जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती
2 IND vs BAN : मायदेशात खेळताना इशांतला सूर सापडला, निम्मा संघ केला गारद
3 IPL 2020: रविंद्र जाडेजा यंदा मुंबईकडून खेळणार?; CSK म्हणते…
Just Now!
X