27 January 2021

News Flash

ऐतिहासिक विजयासह विराट कोहलीला मानाच्या पंगतीत स्थान

दुसऱ्या कसोटीत भारताची बांगलादेशवर मात

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कोलकाता कसोटी सामन्यात विजय मिळवत २ सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन केलं. १ डाव आणि ४६ धावांनी भारताने सामन्यात बाजी मारली. आपला पहिला दिवस-रात्र आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या विराटने शतकाची नोंद करत अनेक विक्रमांची नोंद केली. या विजयासह विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये दिग्गज कर्णधारांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : गुलाबी कसोटीत ‘विराट’सेनेची ऐतिहासिक कामगिरी

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट सध्या ३३ विजयांसह पाचव्या स्थानावर पोहचला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा सलग सातवा विजय ठरला आहे. याचसोबत कसोटीत सलग ४ सामने डावाने जिंकण्याचा मानही भारतीय संघाला मिळाला आहे. याआधी २०१३ साली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सलग ६ विजयांची नोंद केली होती. २०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकेला सामोरं जावं लागणार आहे.

अवश्य वाचा – टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये ‘सत्ते पे सत्ता’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 3:05 pm

Web Title: ind vs ban 2nd test kolkata virat kohli secure his place in top 5 captain league psd 91
Next Stories
1 Video : अशी उडाली बांगलादेशच्या संघाची दाणादाण
2 टीम इंडियाची कसोटी क्रिकेटमध्ये ‘सत्ते पे सत्ता’
3 IND vs BAN : गुलाबी कसोटीत ‘विराट’सेनेची ऐतिहासिक कामगिरी
Just Now!
X